Sunday, July 5, 2015

आदरांजली

आदरांजली

गेलास निघून तु ठेवून आठवांचा सागर
माय
(तुमची) आक्रंदते बाबा, दु: झाले अपार!

आस वेडीच राहिली, उरला दैवाचा कैवार
येईल
 कोणी "अवधूत" अन् करेल प्राण पुरस्कार!

असे कुठे घडते का, नकळे पुण्याईचे सार
वाटले
 होते आहे, बळ कुंकवाचे थोर!

नाहीच उमगली नियतीची चाल अन् घाव
पहाडाची
 छाती तुमची, पडला तिथेच वार!

राहिलो मागे आम्ही, गेलात निघून पैल-पार
दिसाल
 तरी कधीतरी, आईच्या डोळ्यांचा नलगे थांग!


हिमांशु डबीर
-जुलै-२०१५
अभिजीत मित्रातुझ्या वडिलांना हि माझी आदरांजली!