Thursday, January 1, 2015

शांत झोपेत अचानक्

शांत झोपेत अचानक् जाग आली होती,
सर पावसाची कोसळत होती!
चिंब अंगांगचिंब आसमंत,
चिंब सृष्टी चिंब न्हाली होती,
पाणी वाढताना उमगलेपातळी दारांत आली होती!
शांत झोपेत अचानक् जाग आली होती

घाबरा मी हिला म्हणालो
अगं पाणी घरांत घुसले,
थैमान घालतो पाउसती धावली...
काही आणायालामी ही धावलो,
सापडेना काहि... आता...
मंत्र सूर्य म्हणू...
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...

धांडोळा मग मंत्रांचा
सपाटा उच्चारवांचाकुठला मंत्रयंत्र कुठले,
शांत स्त्ब्ध अंतरंग सारे ,
पाणी घरात त्यात तरंगे संसार!
हि शोधते काहि.. अजूनहि...
चिडूनरडूनभांडूनथकून...
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...

स्वप्नच होते सारेतरी पाणी आले होते,
चिंब पावसाने तरी सारे कुठे भिजले होते!
असेच व्हायला नको होते
स्वप्नातल्या पावसाने.. खरे खरेच 
भिजवायला हवे होते!
शांत झोपेत अचानक् जाग आली होती...


हिमांशु डबीर

वेडंच होते ना ते...!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!
तो अर्ध-उध्वस्त कट्टा,
तो फेसाळणारा सोडा,
तो मोरपंखढापलेला,
तो सुगंधी एकांततुझ्यापासून चोरलेला!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!
ते बेधुंद वारे,
ते मनसोक्त फिरणे,
ती मौनातली भांडणे,
ते लडिवाळ स्पर्शकधी नकळत तर कधी मुद्दामलेले!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

शब्दांमधून उमलणारी तू आजही 
जुन्या कवितांतूनही  भेटत राहतेस,
मोरपिसांतून झळाळणारी तू आजही
कृष्ण-सावळ्या मेघांतूही पाझरत राहतेस!
मनगाभा-यात दरवळणारी तू आजही
सोनचाफ्यातून उमलत राहतेस!
वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!

वेडंच होते ना ते...! कि होते प्रेम आपुले!



हिमांशु डबीर